Production

भारतात अनेक जातीधर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात आणि या अनेक जाती धर्मांबरोबरच 'क्रिकेट' आणि 'सिनेमा' या दोन गोष्टींबाबत आम्ही भारतीय धर्माइतकेच कट्टर आहोत. आजपासून जवळपास शंभर वर्षांपूर्वी 'दादासाहेब फाळके' नावाच्या चित्रमहर्षीने या धर्माची मुहूर्तमेढ रोवली. या गेल्या शंभर वर्षाच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीही अनेक बदलांतून गेली. तिकीट खिडकीवरील यशापयशाबरोबरच विषय आणि त्यांच्या मांडणीतही बदल होत गेले.

सध्या पुन्हा एकदा मराठी चित्रपट व्यवसायामध्ये बदलाचे वारे वाहत आहे. नियमित निर्मिती करणाऱ्या निर्मितीसंस्थाबरोबरच उत्सुक निर्मात्यांचेही या व्यवसायामधले योगदान गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले आहे. यात सरकारी योजना आणि satellite हक्क विकून मिळणाऱ्या मोबाद्ल्या बरोबरच तिकीट खिडकीवर पहायला मिळू लागलेले यशही तितकेच महत्वपूर्ण आहे.

कोणत्याही व्यवसायाला आदर्श व्यावसायिक स्वरूप येण्यासाठी त्या व्यवसायातील बलस्थानं ओळखावी लागतात. उत्तम आशयघन चित्रपटांची निर्मिती, त्याला अनुसरून केली गेलेली योग्य प्रसिद्धी, आणि सबळ वितरण व्यवस्था ही या व्यवसायातील हमखास यशाची त्रिसूत्री आहे.

देविशा फिल्म्सची प्रथम निर्मिती असणाऱ्या 'देऊळ' पासूनच या तीनही बाबींचा सखोल विचार केला गेला. २०११ मध्ये पदार्पणातच 'देऊळ' चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कारा सोबतच अनेक सन्मान आणि तिकीट खिडकीवर १०० दिवस पूर्ण करत व्यावसायिक यश मिळवण्याचा मान प्राप्त झाला.

२०१२ सालात प्रदर्शित झालेल्या प्रमुख चित्रपटांच्या यादीत देविशा फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या 'भारतीय' या चित्रपटाचे नाव घेतले जाते. प्रदर्शनाच्या काळात उद्भवलेल्या 'एक था टायगर' सोबतच्या वादातून वाट काढत केवळ हक्काची चित्रपटगृहे राखण्यातच नाही तर त्या वर्षीच्या उच्चांकी व्यवसाय करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीतही 'भारतीय' ने स्थान पटकवले. या सर्वातूनच देविशा फिल्म्सची व्यवसायावर असणारी घट्ट पकड दिसून येते.

आगामी काळात केवळ चित्रपट निर्मितीच नव्हे तर त्याला साह्यभूत होणाऱ्या पायाभूत सुविधा आणि संलग्न व्यवसायांचा देखील देविशा फिल्म्स प्राधान्यक्रमाने विचार करत आहे.

forthcoming

Release Date
28th Feb 2014
Release Date
17th Jan 2014

Awards